“ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या
त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा
विश्वासू माणसांना सोपवून दे” (2 तीमथ्य 2:2)
थ्रू द स्क्रिप्चर्स हे सर्सी, अर्कांसास येथील Truth for Today या जागतिक ख्रिश्चन धर्मतत्त्वांना समर्पित असलेल्या एका बहुस्वरूपीय ना-नफा संघटनेचे कार्य आहे. ही संघटना ही हार्डिंग विद्यापिठामध्ये बायबल व प्रचार अभ्यासक्रमाचे प्राध्यापक असलेल्या एडी क्लोएर ह्यांच्या निदर्शनाखाली चालवली जाते, TFT आपल्या प्रभूचे पवित्र धर्मग्रंथ शिकवण्यासाठी झटते.
अनुभवी धर्मप्रसारक मान्य करतात की जगभरामध्ये रुजलेली ही मैफल टिकून राहणे व तिची धार्मिक वाढ होणे हे बायबलच्या गुणवत्तापूर्ण अभ्यास साहित्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असू शकते. ही गरज पूर्ण करण्यासाठी ट्रुथ फॉर टुडेची रचना केली आहे.
शिक्षण साहित्य हे नवीन ख्रिस्ती कराराच्या पुनरस्थापनेशी सुसंगत असल्याची खात्री करण्यासाठी विशिष्ट आशय मार्गदर्शक सूचना स्थापित केलेल्या आहेत. विशेषत:, (अ) हे साहित्य नवीन करार चर्चचा आदर आणि उन्नती करण्यासाठी आहे आणि कोणत्याही मार्गाने सांप्रदायिकतेला; म्हणजे माणसांनी निर्माण केलेले धार्मिक समुदाय यांना मंजूरी किंवा हात देत नाहीत; (ब) या साहित्याने बायबलच्या शिकवणींना एका सुरक्षित आणि वास्तवातील मार्गाने प्रदर्शित करण्यावर लक्ष केंद्रित करायलाच हवे; (क) हे साहित्य, पवित्र ग्रंथात शिकविल्यानुसार, विश्वास, पश्चात्ताप, येशू ख्रिस्ताचा कबुलीजबाब आणि पापांच्या क्षमेला नवी दृष्टी यांच्यामार्फत मोक्षाचा मार्ग याबद्दल नेहमीच स्पष्ट असायला हवे; (ड) नवीन करार नमून्यानुसारच प्रभूच्या आराधनेचा प्रसार केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या मानवी नावीन्यपूर्ण गोष्टींना कोणत्याही प्रकारे मान्यता व्यक्त करणारे नसावे; (इ) या साहित्याने त्यांची अनंतकाळची तत्त्वे, जी कोणत्याही संस्कृतीत सुयोग्यपणे लागू होऊ शकतात, त्यांचा अमेरिकन ख्रिस्तीधर्म विरुद्ध नवीन कराराचा जागतिक ख्रिस्तीधर्म असा मतभेद करू नये.