आमच्या शाळेत स्वागत
तुम्हाला येथे भेटून आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ThroughTheScriptures.com मध्ये तुमचे स्वागत आहे. आम्हाला विश्वास आहे की तुम्हाला हा प्रवास आवडीचा, माहितीपूर्ण आणि तृप्त करणारा वाटेल. मॅथ्यू 28 मध्ये, येशू त्याच्या शिष्यांना सांगतो, “तेव्हां तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावानें बाप्तिस्मा द्या”. जाण्याची आज्ञा अनेक मार्गांनी पूर्ण झालेली आहे. सुरूवातीला, हा संदेश घेऊन जागोजागी चालत जाऊन आणि त्याचा उपदेश करून हि आज्ञा पूर्ण झाली. नंतर, प्रभूचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही जहाजातून समुद्रावर गेले आणि एका किनारपट्टीवरून दुसर्या किनारपट्टीवर गेले. इतरांनी पत्रे लिहिली जी दूतांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवली आणि मोठयाने वाचली गेली. त्यानंतरच्या काळात, आपल्याकडे लेखी शब्द आले- बायबल, भाष्य आणि इतर बायबलविषयक साहित्य जे जगभरातील लोकांना वितरित केले गेले ज्यामुळे ते येशूबद्दल शिकू शकतील. आज आम्ही ऑनलाइन बायबल अभ्यासामार्फत सर्वत्र घराघरात आणि लोकांच्या हृदयात पोहोचू शकलो आहोत.
ThroughTheScriptures.com हे सुप्रसिद्ध बायबलच्या अभ्यासकांनी तयार केलेले बायबल अभ्यास साहित्य सादर करीत आहे. ते एक स्पष्ट आणि तर्कशुद्ध मार्ग प्रस्तुत करते ज्यामुळे बायबलचे प्रत्येक पुस्तक, जुना करार आणि नवीन करार दोन्ही शिकता येते. वेगवेगळ्या पंचवीस भाषांमध्ये बायबलचा प्रत्यक्ष सखोल अभ्यास असल्याकारणाने ते अनोखे आहे. ThroughTheScriptures.com अविश्वसनीय मूल्य प्रस्तुत करते. छोट्याशा नोंदणी शुल्क दिल्यानंतर, तुम्हाला संबंधित बायबल अभ्यास साहित्य, साहित्यावर तज्ञांचे भाष्य, तुम्ही साहित्य किती चांगले शिकत आहात हे तुम्हाला माहीत होण्यासाठी स्वयं-मूल्यमापन अभ्यास आणि अभ्यासक्रमातील प्रत्येक गट पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झाल्याचे प्रशस्तीपत्रक मिळते. त्यानंतर, शेवटी एका मौल्यवान बायबलसंबंधी संदर्भांचे एक ग्रंथालय तुमच्या ताब्यात असते. पण त्याहूनही अधिक म्हणजे, प्रभूच्या शब्दाबद्दल शिकताना, ThroughTheScriptures.com तुम्हाला प्रभूचे शब्द जगण्यासाठी, प्रभूच्या सत्यात जगण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेने जगण्यासाठी प्रोत्साहित करेल. तसे करून, प्रभूने पृथ्वीतलावरील विपुल आणि समाधानी जीवनाचे आणि आपला येथील काळ संपल्यानंतर स्वर्गातील शाश्वत जीवनाचे वचन दिलेले आहे. आम्हाला खूप आनंद होत आहेत की तुम्ही ThroughTheScriptures.com मध्ये आमच्याबरोबर आहात आणि या प्रवासात प्रभूचे आशीर्वाद तुमच्यापाठीशी असतील अशी अशा करतो.
- वैयक्तिक निवड
- कोणतेही पुस्तक, कोणत्याही वेळी निवडा! आमचे वैयक्तिक अभ्यासक्रम म्हणजे तुमच्या आवडीला उत्साहित केलेल्या एखाद्या विशिष्ट पुस्तकात सखोल जाण्याची एक उत्कृष्ठ संधी आहेत.
- अधिक जाणून घ्या
- सेमिस्टर अभ्यास
- सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण धर्मग्रंथांमधून शिका. बायबलच्या प्रत्येक पुस्तकाचे सखोल विश्लेषण पुरविणार्या अनुक्रमित अभ्यासक्रमांसह आमची शाळा विद्यार्थ्यांना एक आदर्श शैक्षणिक व्यासपीठ देते.
- अधिक जाणून घ्या
- शाळा कशी सुरू करायची
- इतरांबरोबर बायबल शिकायचे आहे का? एका गटात एकत्र या आणि तुमचे बायबलसंबंधी समजून घेणे एकत्रितपणे वाढविण्यासाठी एक अभ्यास गट तयार करण्याच्या आमच्या टिप्स आणि सर्वोत्तम पद्धती शिका.
- अधिक जाणून घ्या
थ्रू द स्क्रिप्चर्सचा काळजीपूर्वक अभ्यास करणे
थ्रू द स्क्रिप्चर्सचा हेतू जगातील प्रत्येकाला बायबलचे शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. कोणालाही ज्याला बायबल काय सांगते हे जाणून घ्यायचे आहे तो शिकण्याच्या संधीस लायक आहे. शक्य तितक्या जास्त लोकांना ही संधी द्यावी, आमचे अभ्यासक्रम 23 भाषांमध्ये उपलब्ध करून देऊन जगभरात पोहोचण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या अभ्यासक्रमात नोंदणी करण्यातून मिळणारा प्रत्येक डॉलर या ध्येयाला थेट अर्थसहाय्य करण्यासाठी वापरला जातो.
मोफत शिष्यवृत्ती नोंदणीसाठी क्लिक करा
वैयक्तिक अभ्यास किंवा पवित्रशास्त्रसंबंधी शिक्षण केंद्र
केवळ, अमेरिका बाहेरील