इफिसकरांस पत्र आणि फिलिप्पैकरांस पत्र
पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती लोकांना “ख्रिस्तामध्ये” असलेल्या महान आध्यात्मिक आशीर्वादांचे स्पष्टीकरण दिले आहे. हे यावर जोर देते की आपल्या प्रभूला पित्याच्या उजवीकडे बसवून त्याला मंडळीचा प्रमुख म्हणून राज्य करण्यास दिले आहे. विविध सदस्यांचा समावेश असलेल्या या एका शरीराला विश्वासात आणि देवाचे अनुकरण करणारी जीवनशैली जगण्यासाठी पाचारण केले आहे. हे पत्र आपल्याला आठवण करून देते की आपण आध्यात्मिक लढाईत गुंतलेले आहोत ज्यात देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करण्याची आणि सतत दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात सुवार्तेच्या कार्यात सहकार्य करीत असलेल्या ख्रिस्ती लोकांची प्रशंसा केली आहे. पौलाने विश्वास ठेवणाऱ्या लोकांना स्वर्गातील राज्याचे नागरिक म्हणून जगण्यास व एकचित्त असण्यास आव्हान केले आहे. हे ऐक्य ख्रिस्ताचे अनुकरण केल्याने येते, ज्याने देहधारण करून पृथ्वीवर येण्याद्वारे नम्रता दाखविली. ख्रिस्ताप्रमाणे आपणही श्रेष्ठ होण्यापूर्वी आपल्याला दु: ख व छळ सहन करणे आवश्यक आहे. जे लॉकहार्ट आणि डेव्हिड एल. रोपर यांनी अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि सेवाकार्यातून आपल्या वाचकांना या पत्रांद्वारे आव्हानात्मक जीवन जगण्यास गुंतवून ठेवले आहे. देवाच्या वचनाचा अभ्यास करणार्या सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यास क्रमाचा फायदा होईल.