कलस्सैकरांस पत्र आणि फिलेमोनाला पत्र
कलस्सैकरांस पत्रात एकात्मिक आणि वैविध्यपूर्ण समाजासाठी महत्त्वाची शिकवण आहे. कलस्सै येथील मंडळी वाढू लागल्यावर सदस्यांना ख्रिस्ती या नात्याने त्यांची ओळख आणि देवाशी असलेले नातेसंबंध समजून घेण्याच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. कलस्सैकरांस आणि फिलेमोनला लिहिलेल्या पत्रांमध्ये धर्मशास्त्रीय सत्ये आणि विश्वासाच्या व्यावहारिक मुद्द्यांकडे लक्ष दिले आहे. या बाबी शाश्वत आहेत आणि या पुस्तकांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे हा जीवन बदलवणारा अनुभव ठरेल. ओवेन डी. ओल्ब्रिक्ट (Owen D. Olbricht) आणि ब्रुस मॅकलार्टी (Bruce McLarty)