ख्रिस्ताचे जीवन, २

शुभवर्तमानाचा वृत्तांत वाचून प्रत्येक ख्रिस्ती माणसाने रोमांचित झाले पाहिजे . येशूच्या जीवनातील घटना ज्या क्रमाने घडल्या त्या कालक्रमानुसार मांडून, डेविड एल. रोपर एका अध्ययन अनुभवाची जबाबदारी हाती घेतात, हा अनुभव येशूच्या जीवनाच्या नमूद केलेल्या प्रत्येक भागाचे अवलोकन करतो. त्याचे शब्द, संभाषण आणि कामे ज्यांचा रोजच्या जीवनात उपयोग सर्वत्र विखुरलेला आहे जो वाचकांस ख्रिस्ताप्रमाणे जगण्यासाठी आव्हान करतो. ख्रिस्ताच्या जीवनाचा ज्वलंत अनुभव आमच्या अंतःकरणात ओततात, ज्यात पॅलेस्टाईनचा भूगोल, त्याच्या लोकांच्या चालीरीती, आणि येशूच्या सभोवताली असलेल्या लोकांच्या विभिन्न गटांची शब्दचित्रे दिसून येतात. हा अभ्यासक्रम पित्याकडून आमच्याकडे ख्रिस्ताने आणलेला संदेशच मांडत नाही, तर त्याच्या जीवनाचे वातावरण घडवणारी ती दृश्ये आणि ध्वनीकल्लोळ, धूळ आणि सजीव परिस्थिती, रात्र आणि दिवस देखील मांडतो. विचारपूर्वक हा आणि पुढील अभ्यासक्रम आणि वाचणारा कोणताही व्यक्ती पूर्वीसारखा राहणार नाही. येशूसोबत चालणारा, त्याची शिकवण ऐकणारा, त्याच्या काळातील लोकांशी त्याला बोलताना पाहणारा, आणि त्याच्या मरणाची व पुनरुत्थानाची साक्ष देणारा असा कोण आहे ज्याच्यात बदल घडून येणार नाही!


अभ्यासक्रमाबरोबर काय येते?

हा 50-दिवसांचा अभ्यासक्रम तुम्हाला गरजेच्या असणार्‍या सर्व गोष्टींसह येतो. तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ गरजेचा असल्यास, तुम्ही अतिरिक्त 30 दिवसांनी तुमचा अभ्यासक्रम वाढवू शकता. काही नमूना अभ्यासक्रम साहित्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

डिजिटल पुस्तक

अभ्यासक्रमासाठी ख्रिस्ताचे जीवन, २ हे तुमचे शिक्षक असतील, त्यांनी लिहिलेल्या डेविड एल. रोपर या पुस्तकाची डिजिटल प्रत अभ्यासक्रम संपल्यानंतर तुमच्याकडे ठेवण्यासाठी तुमचीच असेल.

पाच अभ्यास मार्गदर्शक

तुम्ही वाचत असताना हे तुम्हाला लक्ष देण्यासाठीच्या महत्त्वाच्या व्याख्या, आशय, लोक आणि ठिकाणे पुरवून तुमच्या परीक्षांची तयारी करण्यात मदत करेल.

सहा परीक्षा

तुम्हाला थोपविण्यासाठी नाही तर मदत करण्यासाठी डिजाइन केलेल्या प्रत्येक परीक्षेत पन्नास प्रश्न असतात जे नेमलेल्या वाचनातून घेतलेले असतात, जे शिकविले जात आहे ते तुम्हाला समजत असल्याची खात्री करण्यासाठी. शेवटची परीक्षा सर्वसमावेशक असते.

वाचनाच्या वेगाचा मार्गदर्शक

तुमच्या वेगाचा मार्गदर्शक वाचत असताना तुमच्या वाचन वेळापत्रकाच्या सर्वोच्च स्थानी रहा. हा मार्गदर्शक तुम्हाला हे सांगतो की अभ्यासक्रम इच्छित वेळेत पूर्ण करण्यासाठी दररोज तुम्हाला कोणती पाने वाचणे गरजेचे आहे.

अभ्यासातील मदत

तुमच्या या अभ्यासक्रमातील शिकण्याला पूरक म्हणून हा अभ्यासक्रम जादा अभ्यास साहित्यासह येतो.