मार्क १-८
जेव्हा आपण शुभवर्तमान वाचतो तेव्हा आपण नेहमी उत्तेजित व्हायला हवे. शुभवर्तमान वृत्तांताचे ज्ञान मिळवण्याशिवाय येशूच्या मनात खोलवर जाण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही. आपल्या प्रभूच्या जीवनातील या नोंदी नवीन प्रकाश मिळविण्याचे आणि नवीन आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आनंद प्राप्त करण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहेत.
मार्क येशूला एक नम्र सेवक, शब्दांपेक्षा कृती करणारा माणूस म्हणून सादर करतो. परिणामी, येशूच्या शिकवणीं नाही तर त्याची कार्ये, त्याच्या जीवनाच्या आणि सेवाकार्याच्या या नोंदीवर प्रभुत्व गाजवतात.
मार्क शुभवर्तमानाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्याने तुमचे आणि इतरांचे जीवन बदलेल. आपल्या प्रभूच्या जीवनाच्या या वृत्तांतात आढळणारे संदेश आपल्या अंतःकरणात दैवी जीवन जगण्याची आणि इतरांना सुवार्ता सांगण्याची उत्कट इच्छा उत्पन्न करू शकतात. मार्टेल पेस (Martel Pace)